तोट्यात चालणारा जिल्हा दूध संघ नफ्यात आणला -आ. मंगेश चव्हाण

0

जळगाव ;- जिल्हा दूध संघ अडचणीत आला होता . एकाथराव खडसे यांच्या कार्यकाळात जिल्हा दूध संघ हा तोट्यात असताना आम्ही डिसेंबर २०२२ पासून कार्यरत झालो असून तोटा भरून आम्ही दूध संघ हा नफ्यात आणल्याची माहिती जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष आ. मंगेश चव्हाण यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांनी याप्रसंगी त्यांनी खडसेंसह विरोधकांवर जोरदार टिका केली.

जिल्हा दूध संघातील कर्मचाऱ्यांचे मानधन वाढविले,शेतकर्याना दुधाचा भाव वाढवून दिला आहे. लेख परीक्षण अहवालात गंभीर आक्षेप घेत दूध लोणी तूप यांच्यात गैरव्यवहार झाल्याचे म्हटले आहे. तत्कालीन एमडी यांचा सुप्रीम कोर्टाने अर्ज फेटाळला आहे. परिवाराला वाचविण्यासाठी एकनाथराव खडसे यांचा आक्रोश मोर्चा असल्याची टीका आ. मंगेश चव्हाण यांनी यावेळी केली. शेतकऱ्यांसाठी आक्रोश कामी आणि आ. खडसे यांचा आक्रोश जास्त होता .

लेखा परीक्षण अहवालात ऑडिटर यांनी नमूद केले आहे कि, जाणीवपूर्वक खोट्या नोंदी करण्यात आल्या असून १ कोटी ६७ लाख ५७ हजार रुपयांचा अपहार करण्यात आल्याचे आ. चव्हाण यांनी सांगितले. सहकार विभागाकडून अतिरिक्त तक्रार दाखल करण्याचे सुचविण्यात आल्याने आ. खडसे यांचा आक्रोश वाढला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.