बसचे टायर फुटले; मुक्ताईनगर जवळ अपघात… १५ जखमी…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील पारंबी ते कुर्‍हा दरम्यान मुक्ताईनगर आगाराच्या बसचे अचानक टायर फुटल्याने अपघात झाला आहे. यावेळी अपघातात दहा ते पंधरा जण जखमी झाल्याची घटना आज सकाळी घडली.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, मुक्ताईनगर आगारातील बस क्र. MH 20 BL 17 70 प्रवाशांना घेऊन पारंबी कडे जात असताना पारंबी ते कुर्‍हा दरम्यान असलेल्या पारंबी फाट्याजवळ बसचे टायर अचानक फुटल्याने बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटले व बस रस्त्यावरून रस्त्याच्या खाली उतरली. परंतु बस चालकाने बस नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. यात आळंद सुनील झांबरे (22), मानेगाव येथील समाधान तायडे (69), वडोदा येथील कमल गोविंदा पवार (59), जानोकार त्र्यंबक महाले (75). वेळ सांगवे येथील अनुराधा पाटील (35), शिरसोली येथील कस्तुराबाई भोलांकर (70), जामनेर येथील सपना विनोद पाटील (27) तसेच जामनेर येथीलच सार्थक विनोद पाटील (2) आदींचा जखमींमध्ये समावेश आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसची दुरवस्था झाल्याच्या बातम्या, आणि त्यात अपघाताच्या बातम्या सातत्याने येत आहेत. त्यामुळे बसेसची परिस्थिती अतिशय वाईट आणि दयनीय अवस्था झाल्या आहेत. या बसेसला आवश्यक असलेली दुरुस्ती व त्या कामे लागणारे साहित्य हे संबंधित विभागातर्फे वेळेवर उपलब्ध करून दिले जात नसल्याने वारंवार वाहने रस्त्यावर नादुरुस्त होऊन उभे राहणे, कधी ब्रेक फेल होणे, तर कधी टायर न बदलल्यामुळे टायर फुटण्याचे प्रकार होत असतात. त्यातच पावसाळ्यामुळे रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडलेले आहे. यामुळे सदर वाहनांची देखभाल व दुरुस्ती वेळेवर होणे गरजेचे आहे. तसे न झाल्यास बुलढाणा सारख्या घटनांना तोंड द्यावे लागते. याबाबत वारंवार वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधूनही बऱ्याचदा संबंधित विभागाच्या तांत्रिक अडचणी सोडविल्या जात नसल्याने याबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे परंतु यामुळे प्रवाशांच्या व एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.