ब्रेकिंग; उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांच्यावर प्राणघातक हल्ला

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

वाळूच्या डंपर वर कारवाईसाठी गेलेले निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांच्यावर वाळू माफियांनी प्राण घातक हल्ला केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.

यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार आणि तहसीलदार बनसोडे हे रात्रीच्या सुमारास भुसावळ दिशेने शासकीय कार्यक्रमाला जागा पाहण्यासाठी गेले होते. तेथून परत येत असताना पावणे बारा वाजेच्या सुमारास त्यांना राष्ट्रीय महामार्गावर महिंद्रा शोरूमच्या जवळ वाळूचे डंपर दिसले. त्यांनी तहसीलदार बनसोडे यांना या डंपर वर कारवाई करण्याचे सांगितले त्यानुसार कारवाई सुरू असतानाच दुसरे डंपर आले व थोड्याच वेळात दुचाकी व चारचाकीतून वाळू माफिया आले.

या टोळक्याने आदिवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार व तहसीलदार बनसोडे यांच्यावर लोखंडी रोडने हल्ला केला त्यात सोपान कासार हे जखमी झाले असून त्यांच्या शासकीय वाहनाचे देखील नुकसान झाले आहे.

या घटनेची माहिती मिळतात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद जिल्हा पोलीस अधीक्षक महेश वर रेड्डी यांच्यासह अधिकाऱ्यांनी धाव घेतली. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा, या प्रकरणात काहीजणांना अटक करण्यात आली. असून सोपान कासार यांना शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच एरंडोल येथील प्रांताधिकार्‍यांवर वाळू माफियांनी प्राण घातक हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच थेट निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांवर हल्ला झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.