धक्कादायक; लाइव्ह कॉन्सर्टनंतर गायक सोनू निगम जखमी

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

सोनू निगम (Sonu Nigam) हा आपला लाइव्ह कॉन्सर्ट (Live concert) करत असतांना जखमी झाला आहे. चेंबूरमध्ये सोमवारी रात्री लाइव्ह कॉन्सर्टनंतर गायक सोनू निगमसोबत धक्काबुक्कीची घटना घडली. शिवसेना (Shiv Sena) ठाकरे गटाचे आमदार प्रकाश फातर्पेकर यांचा पुत्र स्वप्निल फातर्पेकरला सोनू निगमसोबत सेल्फी क्लिक करायचा होता. मात्र त्यावेळी बॉडीगार्डने अडवल्यामुळे त्याने धक्काबुक्की केली. यावेळी सोनू निगमला वाचवण्यासाठी त्याचा मित्र रब्बानी खान समोर आला. रब्बानीने धक्काबुक्कीदरम्यान सोनू निगमला वाचवलं खरं, मात्र त्यात तो स्वत: जखमी झाला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओत सोनू निगमला वाचवणारा रब्बानी खान आहे तरी कोण, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.

रब्बानी मुस्तफा खान हा सोनू निगमचा मित्र आणि बॉलिवूड गायक आहे. धक्काबुक्कीच्या घटनेवेळी तो सोनूसोबतच होता. जेव्हा सोनूसोबत सेल्फी घेण्यावरून धक्काबुक्की करण्यात आली, तेव्हा रब्बानीने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि स्वत: पायऱ्यांवरून खाली पडला. पायऱ्यांवरून पडल्याने त्याला दुखापतही झाली. रब्बानीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज मिळाला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.