पाचोऱ्यात ३५ वर्षीय इसमाची गळफास लावून आत्महत्या

0

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क

शहरातील मोंढाळे रोडवरील गजानन नगर भागातील एका ३५ वर्षीय इसमाने आपल्या राहत्या घरात गळफास लावून जीवनयात्रा संपविल्याची घटना २० फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून इसमाने आत्महत्या का केली असावी ? याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. याबाबत सविस्तर वृत्त असे की, पाचोरा शहरातील रेल्वेस्थानका जवळ असलेल्या हाॅटेल चंद्रलोक मध्ये प्रसिद्ध आचारी म्हणून काम करणारे किरण रघुनाथ महाजन (वय – ३५) रा. गजानन नगर, मोंढाळे रोड, पाचोरा हे २० फेब्रुवारी रोजी आपले दैनंदिन काम आटोपून दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास आपल्या गजानन नगर भागातील घरी आले. दरम्यान काही वेळानंतर त्यांच्या वहिणी यांनी किरण यांना जेवण करण्यासाठी बोलविले असता किरण यांच्या खोलीचा दरवाजा बंद होता. वारंवार आवाज देवुन सुद्धा खोलीतुन प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांच्या वहिणींनी खिडकीतुन आत डोकावून बघितले असता किरण हे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळुन येताच वहिणी यांनी एकच आक्रोश केला.

शेजाऱ्यांच्या मदतीने किरण महाजन यांना पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी किरण महाजन यांना मृत घोषित केले. मयत किरण महाजन यांचे पाश्चात्य पत्नी, दोन लहान मुले, एक भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अतिशय हसमुख व शांत स्वभावाचे किरण महाजन यांनी आत्महत्ये सारखे टोकाचे पाऊल का उचलले ? हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. किरण महाजन यांच्या अकस्मात मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.