राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत यश मिळविलेल्या पोलिस स्पोर्ट्स अकॅडमीच्या खेळाडूंचा सत्कार

0

जळगाव ;- पुणे येथे स्टेअर फौंडेशन महाराष्ट्र राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धा दिनांक 24 डिसेंबर 2023 यादरम्यान पार पडल्या . त्यात पोलिस स्पोर्ट्स अकॅडमीच्या एकूण 20 स्केटिंग खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत एकूण महाराष्ट्र भरातील 300 खेळाडूंनी सहभाग नोंदविला. यामध्ये जळगावातील विजयी खेळाडू पूर्वेश पुराणिक,प्रज्ञेश कासार,मयंक ठाकरे,निर्णय भावसार,लावण्या पुराणिक,मानसी सूर्यवंशी,मोनीश वाघदे, मानसी चौधरी,तेजस्विनी सोनावणे,शोएब सय्यदउपविजेता खेळाडू -कल्पेश थोरात ,रूपक चौधरी, शादाब सय्यद,वंश पवार,अनिकेत कुलकर्णी,उर्वशी बोरणारे, विनीत महाजन,सक्षम बाउस्कर,तेजल सूर्यवंशी ,आर्यन चौधरी आदींनी यश प्राप्त केले . या खेळाडूंचे जळगाव जिल्हा पोलिसा अधीक्षक एम राजकुमार ,अपर पोलिस अधिक्षक अशोक नखाते,सहाय्यक पोलिसा अधीक्षक जळगाव विभाग संदीप गावित,पोलिसा उपधीक्षक गृह रामकृष्ण कुंभार,राखीव पोलिसा निरीक्षक संतोष सोनवणे, वेल्फेअर पोलीस उपनिरीक्षक रेश्मा अवतारे पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब गायकवाड यांनी कौतुक केले . तसेच यांना जागृती काळे महाजन अश्विनी निकम जंजाळे उज्वला कासार ,स्वीटी गायकवाड, वैष्णवी त्यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave A Reply

Your email address will not be published.