भंडाऱ्यातील आयर्न अँड स्टील कंपनीला भीषण आग, ३ जण जखमी

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

सनफ्लॅग आयर्न अँड स्टील कंपनीत आज पहाटे ३.१५ च्या सुमारास स्फोट होऊन ३ कामगार जखमी झाले आहे. त्यांना उपचारासाठी नागपूर येथील खासगी रुग्णालयात तात्काळ हलविण्यात आले. तर या दुर्घटनेत ७-८ कामगार किरकोळ जखमी झाले असून, त्यांच्यावर प्राथमिक उपचार कार्यात आले.

भंडाऱ्यातील सनफ्लॅग आयर्न अँड स्टील कंपनीतील एसएमएस या विभागातील एलएचएफ युनिटमध्ये ही घटना झाली आहे. घटनेचे मूळ कारण अजून समजले नसून, हीटिंग फरनेसमध्येअचानक मोठा स्फोट झाल्याने तारांबळ उडाली. या भागात कार्यरत ३ कामगार काही प्रमाणात भाजले गेले आहे. काही कामगारांना किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. यात टेक्निसीयन नामदेव झंझाड, अभियंता सागर जमाणे व कंत्राटी कामगार हटवार हे जखमी झाले. त्यांना नागपूर  येथे हलवण्यात आले. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती व्यवस्थापनाने दिली.

परिसरात बसले हादरे
स्टील कंपनीत झालेला स्फोट इतका भीषण होता की कंपनीतील जवळपास असलेला परिसर देखील हादरला आहे. पहाटेच्या सुमारास झालेल्या मोठ्या आवाजाने परिसरातील नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. या दुर्घटनेत कंपनीच्या सामानाचे मोठे नुकसान झाले असून, सुदैवाने प्राणहानी झाली नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.