अर्जुन पुरस्कारप्राप्त डीएक्सपीची गोळ्या झाडून हत्या, परिसरात एकच खळबळ

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

संगरूरमध्ये तैनात असलेल्या डीएसपीचा मृतदेह सापडल्यानंतर पंजाबमधील जालंधरमध्ये खळबळ उडाली आहे. डीएसपी दलबीर सिंग देओल यांचा मृतदेह काल (सोमवारी) बस्ती बावा खेळ कालव्याजवळ रस्त्यावर पडलेला आढळून आला. काही दिवसांपूर्वी जालंधरमधील एका गावात डीएसपी दलबीर यांचे काही लोकांची भांडण झाले होते. यावेळी त्यांनी परवाना असलेल्या बंदुकीने गोळी झाडली. मात्र दुसऱ्या दिवशी त्यांनी गावकऱ्यांशी समेट घडवून आणला.

एडीसीपी बलविंदर सिंग रंधावा यांनी सांगितले की, आम्हला कोणीतरी फोन करून वस्ती बावा खेळजवळ कोणाचा मृतदेह पडल्याची माहिती दिली. आमची टीम घटनास्थळी पोहोचली तेव्हा मृतदेह डीएसपी दलबीर यांचा असल्याचे आढळून आले. जे संगरूर येथे तैनात होते. त्यांच्या डोक्यालाही जखम झाली होती. पंजाब पोलीसांना प्राथमिक हा अपघात असेल असे वाटले मात्र, पोस्टमॉर्टममध्ये डीएसपीमच्या गळ्यामध्ये गोळी अडकल्याचे आढळून आले. घटनेनंतर डीएसपीचे सर्व्हिस पिस्तूलही गायब असल्याचे निदर्शनास आले आहे.

डीएसपींच्या मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ डिसेंबरच्या रात्री न्यू इयर पार्टीनंतर त्यांनी डीएसपींना बस स्टँडच्या मागे सोडले होते. घटनेच्या वेळी डीएसपींसोबत त्यांचे रक्षक उपस्थित नव्हते. पंजाब पोलीस बसस्थानकाच्या आसपासचे सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करत आहे. याप्रकरणी डीएसपींच्या कुटुंबीयांचीही चौकशी केली आहे. जेणेकरून डीएसपीच्या मृत्यूशी संबंधित कोणताही सुगावा मिळू शकेल.

मृत डीएसपींचा भाऊ रणजित सिंह यांनी सांगितले की, दालबीरचा मृतदेह सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याच्या डोक्याला दुखापत झाली आहे. हे खुनाचे प्रकरण असल्याचे समजते आहे. पोलीस त्याचा तपास करत आहे. दलबीर सिंग हे एक प्रसिद्ध वेटलिफ्टर होते. आणि त्यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आले आहे. पोलीस या घटनेचा संपूर्ण तपस करत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.