“जरांगे यांच्या आंदोलनाची ‘एसआयटी’ चौकशी करा”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करा. असे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले आहेत. आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुरुवात झाल्यानंतर दोन्ही सभागृहांमध्ये यावरून सत्ताधाऱ्यांनी जोरदार मागणी केली. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी हे आदेश दिले.

मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे यांनी दोन दिवसांपूर्वी आक्रमक होऊन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कडवी टीका केली होती. तसेच महाराष्ट्राला बेचिराख करण्यापासून वाचवलं असे शब्द वापरले होते. यावरून आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकारच्या बाजूने आमदार आक्रमक झाले. यावेळी जरांगेच्या विधानामागे कोण आहे? याची एसआयटी चौकशी करा, अशी मागणी विधानसभेत आमदार आशिष शेलार यांनी धरून ठेवली तर, विधान परिषदेत प्रवीण दरेकर यांनी केली. तसेच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी देखील एसआयटी चौकशीची व्हावी अशी मागणी केली आहे.

शेलार म्हणाले, “महाराष्ट्र बेचिराख करण्याचं कोणी ठरवलं? ही केवळ धमकी आहे का? या मागची भूमिका काय? यामध्ये संशय आहे का ? यात कोणी कट-कारस्थान केली आहेत का? असे अनेक सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केली आहे. तसेच कोर्टालाही तुम्ही गांभीर्याने घ्या, शांत बसू नका, अशी विनंती शेलार यांनी केली आहे. जरांगेंच्या भूमिकेमुळं मराठा समाजाची बदनामी होत असल्याचंही ते म्हणाले”

Leave A Reply

Your email address will not be published.