‘रेड बॉल’ क्रिकेटविषयी BCCI चा मोठा निर्णय, वाचा सविस्तर

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

भारतीय संघाने रांची कसोटीत इंग्लंडला पराभूत करून मालिकेवर विजय मिळवला आहे. दरम्यान भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ‘रेड बॉल क्रिकेट’ बाबत मोठा निर्णय घेऊ शकते. खरंतर आयपीएल खेळण्यासाठी अनेक खेळाडू ‘रेड बॉल’ क्रिकेट खेळत नाही. त्यामुळे खेळाडूंना कसोटी क्रिकेटची तयारी करता येत नाही आणि खेळाडू ‘रेड बॉल’ च्या क्रिकेट ऐवजी आयपीएल वर अधिक लक्ष केंद्रित करतात.

‘रेड बॉल’ क्रिकेटमध्ये खेळाडूंना आयपीएल मध्ये जेवढे पैसे मिळतात तेवढे मिळत नाहीत अशा परिस्थितीत आता बीसीसी रेड बॉल क्रिकेटमधील खेळाडूंच्या फी वाढवण्याबाबत मोठा निर्णय घेऊ शकते. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, आयपीएलमध्ये खेळण्यासाठी खेळाडू ‘रेड बॉल’ क्रिकेट खेळत नाही. अशी परिस्थिती टाळण्यासाठी बीसीसीआयने कसोटीसाठी मॅच फी वाढवण्याचा विचार केला आहे.

ईशान किशन ने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर कसोटी मालिकेतून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला होता की, इंडियाने मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी ईशान किशनला रणजी ट्रॉफी मध्ये खेळण्याचा सल्ला दिला होता. पण ईशानने रणजी मध्ये एकही सामना खेळला नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.