लोकशाही न्यूज नेटवर्क
सध्या सर्वत्र फाटक आणि फक्त अभिनेता श्रेयश तळपदे याच्या प्रकृतीची चर्चा होत आहे. गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्यानंतर अभिनेत्याला तत्काळ रुग्नालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्नालयात दाखल केल्यानंतर अभिनेत्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. श्रेयस रुग्णालयात दाखल झाल्यामुळे असेंक सेलिब्रेटी त्याची विचारपूस करत आहे. एवढाच नाहीतर, पत्नी दीप्ती तळपदे यांनी देखील सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत श्रेयस याच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली आहे. सध्या श्रेयसची प्रकृतीत सुधारणा होत आहे.
दरम्यान, आता पुन्हा श्रेयस याच्या प्रकृतीबद्दल मोठी माहिती समोर येत आहे. श्रेयस याला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर दहा मिनिटं त्याच्या हृदयाची धडधड थांबली असल्याची माहिती अभिनेता बॉबी देओल याने दिली. आता श्रेयसच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची माहिती आहे. अभिनेत्याला रविवारी संध्याकाळी किंवा सोमवारी सकाळी रुग्णालयातून घरी जाण्यासाठी सोडतील, अशी माहिती समोर येत आहे.