मोठी बातमी; नागपूर मध्ये दारुगोळा तयार करणाऱ्या कंपनीत भीषण स्फोट, वाचा सविस्तर

0

नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क

नागपूरच्या बाजारगावमध्ये एक्सप्लोझिव्ह निर्मिती करणाऱ्या एका फॅक्टरीमध्ये मोठा स्फोट झाला आहे. पाच कर्मचाऱ्यांचा या स्फोटात मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर काही जण आत अडकल्याची देखील भीती व्यक्त केली जात आहे.

सविस्तर माहितीनुसार, स्फोट झालेल्या सोलर या कंपनीत दारुगोळा तयार केला जातो. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, स्फोट झाला त्यावेळी कंपनीत काही कर्मचारी काम करत होते. पाच कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी देखील कंपनीबाहेर झाली आहे. राष्ट्रवादीचे नेत आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख देखील घटनास्थळी रवाना झाले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.