धक्कादायक; धावत्या बसमध्ये तरुणीवर बलात्कार

ओरडण्याचा आवाज लोकांनायेऊ नये म्हणून....

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

चालत्या बसमध्ये तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बसच्या चालकानेच तरुणीवर अतिप्रसंग केला आहेत तर मुलीच्या ओरडण्याचा आवाज बाहेर जाऊ नये म्हणून वाचकाचे लाऊड स्पीकरवर गाणी लावून ठेवली होती. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर, पीडितेच्या तक्रारीवरून बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकार?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी उत्तर प्रदेश येथील रहिवासी असून, ९ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजता ती कानपूरहुन जयपूरला जात होती. प्रायव्हेट बसमध्ये ती प्रवास करत होतु. कानपूरहून बस निघाल्यानंतर जवळपास अर्धा तासाने चालक तिच्याकडे येऊन बोलला की तुझ्या बाजूला दारुडा मुलगा बसला आहे. ती ड्रॉयव्हरच्या सीटवर जाऊन बसली. रात्री जवळपास ११ वाजेच्या सुमारास तिचा तिथेच डोळा लागला. तेव्हा अचानक ड्रायव्हर तिच्याजवळ आला आणि तिच्यावर जबरदस्ती करू लागला.

तरुणीने आरडाओरडा सुरू केल्यानंतर कंडक्टरने बसमधील लाउड स्पीकर सुरू करुन त्यावर मोठ्या आवाजात गाणी लावली. जेणेकरुन तिचा आवाज बाहेर जाऊ नये. तरीदेखील तरुणीच्या ओरडण्यामुळे बसमधील इतर प्रवासी जागे झाले आणि आवाजाच्या दिशेने जात ड्रायव्हर व कंडक्टरला जाब विचारला असता, दोघांनीही पळ काढला. प्रवाशांनी त्या दोघांचा पाठलाग करून चांगलाच चोप दिला.

प्रवाशांनी बस चालकाला पोलिसांच्या हवाली केले आहे. या घटनेनंतर पोलिसांनीही प्रकरणाचे गांभीर्य ओळखून आरोपीला अटक केले आहे तर, बस चालकाविरोधात तक्रार दाखल केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.