अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका

0

मुंबई: अभिनेता श्रेयस तळपदेला गुरुवारी संध्याकाळी शूटिंग संपल्यानंतर अचानक हृदयविकाराचा झटका आला. यानंतर श्रेयसला त्वरीत अंधेरी पश्चिम येथील बेलेव्ह्यू रुग्णालयात नेण्यात आले. तिथे त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली.

 

हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, श्रेयस तळपदे त्याचा आगामी चित्रपट वेलकम टू द जंगलचे शूटिंग करत होता. मात्र अचानक ही घटना घडली आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

श्रेयस तळपदे दिवसभर शुटींगमध्ये व्यस्त होता. तिथे त्याची प्रकृती ठीक होती. शुटींगमध्ये त्याने अॅक्शन असलेले सीक्वेन्स शूट केले. शूट संपल्यानंतर तो घरी परतला. त्याने पत्नीला सांगितले की त्याला अस्वस्थ वाटत आहे. तिने त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेले पण वाटेतच त्याला चक्कर आली. या प्रकरणी रुग्णालयाने सांगितले की, “श्रेयस तळपदे रुग्णालयात दाखल आहे. त्याला संध्याकाळी उशिरा आणण्यात आले.  १० वाजण्याच्या सुमारास त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. तसेच आता अभिनेत्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.

श्रेयस तळपदे वेलकम टू द जंगल या चित्रपटाचं शूटिंग मुंबईत करत होता. या चित्रपटात मोठी स्टारकास्ट आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, जॅकलीन फर्नांडिस, दिशा पटानी, संजय दत्त, आर्शद वारसी, सुनील शेट्टी, रवीना टंडन, लारा दत्ता, जॉनी लीवर, राजपाल यादव, किकू शारदा, कृष्णा अभिषेक, परे रावल, तुषार कपूर, मीका सिंह आणि दलेर मेहंदी असे स्टार कलाकार आहेत. हा चित्रपट 20 डिसेंबर 2024 ला रिलीज होणार आहे. त्यासाठी आतापासून शूटिंग सुरु झालं आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.