समता नगर खून प्रकरणातील तिसरा संशयित जाळ्यात

0

जळगाव  शहरातील समता नगरात राहणाऱ्या अरुण बळीराम सोनवणे (वय २८,रा. समता नगर) या तरुणाचा रविवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास जुन्या वादातून चॉपरने वार करून गळा चिरुन निर्घृण खून करण्यात आला होता. याप्रकरणी पाच संशयीताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, एलसीबीच्या पथकाने आणखी एका संशयिताला अटक केली आहे. प्रवीण उर्फ दोघ्या पिंट्या शिरसाळे असे संशयिताचे नाव आहे.

खून झालेल्या अरुण सोनवणे सोबत प्रवीण उर्फ दोध्या पिंट्या या संशयीताच्या पुतणीचे लग्न ठरले होते. या लग्नास योद्धा उर्फ पिंट्या याचा विरोध होता. यातूनच अरुणचा खून झाला असल्याची माहिती समोर आली होती. संशयीत अशोक महादू राठोड यास एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने मध्य प्रदेशातील नेपानगर येथून अटक केली होती.

तत्पूर्वी एलसीबीचे पो.नि. किसन नजन-पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून त्यांनी कुलदीप उर्फ सोनू आढळे याला विसरवाडी जवळून ताब्यात घेतले होते. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या पथकाने प्रवीण उर्फ दोध्या पिंट्या प्रेमराज शिरसाळे रा.संभाजी नगर, जळगाव याला ताब्यात घेतले आहे. गुन्हा घडल्यापासून स्थानिक गुन्हे शाखेतील उपनिरीक्षक गणेश वाघमारे, सफौ. विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, महेश महाजन, अकरम शेख, विजय पाटील, किरण धनगर, सचिन महाजन, संदिप सावळे, किरण चौधरी, दर्शन ढाकणे, ईश्वर पाटील, प्रमोद ठाकूर हे त्याच्या मागावर होते.

पिंट्या हा त्याचे मुळ गावी नागदुली-म्हसावद येथे आला असून तो तेथून निघुन बाहेरगावी निघुन जाण्याचे तयारीत असल्याची माहिती एलसीबीला मिळाली होती. त्यावरून पथकाने शिरसोली मार्गे वावडदा येथे जावून तिथे सापळा लावला असता वावडदा बसस्टॅन्ड येथील सरपंच चहाचे टपरीचे आडोश्याला उभा असताना पिंट्याला ताब्यात घेण्यात आले. गुन्ह्यातील तीन संशयीत अटक झाले असून अद्याप दोघे फरार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.