अभिनेत्री श्रद्धा कपूरने केला रिक्षाने प्रवास ; व्हिडीओ व्हायरल

0

मुंबई ;- सतत कोणत्या ना कोणत्या कारणांमुळेबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर चर्चेत असते. कधी तिच्या आगामी चित्रपटांमुळे तर कधी खासगी आयुष्यामुळे. काही दिवसांपूर्वीच तिचा नवा लूक सर्वांसमोर आला होता.

आता सध्या सोशल मीडियावर तिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती रिक्षाने प्रवास करताना दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी कौतुक केले आहे.

श्रद्धा कपूर सतत चाहत्यांची मने जिंकत असते. नुकताच तिने मैत्रिणीसोबत रिक्षाने प्रवास केला आहे. फोटोग्राफर्सने तिला कार का घेऊन आली नाही असे विचारले तेव्हा तिने ‘ऑटो सर्वात उत्तम आहेत आणि ऑटो सारखे काहीच नाही’ असे म्हटले. तिचा हा व्हिडीओ पाहून चाहत्यांनी तिचे कौतुक केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.