धक्कादायक : मुंबईत धावत्या रिक्षात विवाहित महिलेची गळा चिरून हत्या

0

मुंबई ;- धावत्या रिक्षात विवाहित महिलेची गळा चिरून हत्या करण्यात आल्याची थरारक घटना मुंबईतील साकिनाका परिसरात समोर आली आहे.

मुंबईतील मीरा रोड येथील हत्याकांडाची घटना ताजी असतानाच आता साकिनाका परिसरात धावत्या रिक्षात विवाहित महिलेची हत्या करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. आरोपीने महिलेचा गळा चिरून हत्या केली आहे, त्यानंतर आता मुंबई पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याची चौकशी सुरू केली आहे. दीपक बोरसे असं आरोपीचं नाव असून मृत महिलेशी त्याचे प्रेमसंबंध असल्याची माहिती आहे. महिलेची हत्या केल्यानंतर आरोपी दिपकने स्वत:वरही हल्ला केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. मीरा रोड आणि मरीन ड्राईव्ह येथील हत्येच्या घटनेनंतर आता मुंबईत ही तिसरी हत्येची घटना घडल्याने राजधानीत खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या साकिनाका परिसरात राहणाऱ्या रिक्षाचालक दीपक बोरसे याचं एका विवाहित महिलेशी प्रेमसंबंध होते. दोघे रिक्षात बसून खैराणी रोडवरून जात असताना दोघांमध्ये जोरदार वाद झाला. त्यामुळं संतापलेल्या दीपकने महिलेच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करत जखमी केलं. त्यानंतर महिलाच घटनास्तळीच मृत्यू झाला.

त्यानंतर दीपकनेही स्वत:वर वार करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. महिलेची हत्या झाल्याची माहिती समजताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, परंतु तोपर्यंत तिचा मृत्यू झालेला होता. आरोपी दीपक बोरसेला पोलिसांनी अटक केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.