शिवसेना उपनेते पदाच्या नियुक्त्या जाहीर; ‘या’ निष्ठावंतांना संधी

1

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

शिंदे गटाने शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. अनेक जण उद्धव ठाकरेंची साथ सोडून गेल्यानंतर उद्धव ठाकरेंकडून नव्याने सेनेची पुनर्बांधणी केली जात आहे. यासाठी उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचे उपनेते जाहीर केले आहेत.

किशोरी पेडणेकर, दत्ता दळवी, कोल्हापूर सिंधुदुर्ग जिल्हाचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, युवासेना सरचिटणीस अमोल कीर्तिकर, ज्योती ठाकरे, संजना घाडी आणि आशा मामेडी यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस निघालेल्या पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे. निष्ठांवंत शिवसैनिकांची काळजी घेत त्यांना बळ देण्याचे प्रयत्न उद्धव ठाकरे करत आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरेंनी शिवसेना नेतेपदाच्या नियुक्त्या जाहीर केल्या होत्या. यामध्ये आक्रमक आणि निष्ठावंत आमदार भास्कर जाधव आणि ठाकरेंची शेवट्पर्यंत साथ देणारे खासदार अरविंद सावंत यांची निवड करण्यात आली आहे. तर सेनेचे दिग्गज नेते लीलाधर डाके यांचे सुपुत्र पराग लीलाधर डाके यांची शिवसेना सचिवपदी नियुक्ती करण्यात आली.

1 Comment
  1. Dharmendra Badgujar sir says

    फारच छान ‘ साहेब आपले प्रयत्न वाया जाणार नाहीत . आपणांस भरघोस पाठींबा मिळेल लोकांची सहानुभूती आपल्या साठी प्रेरणादायी आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.