शिरसोली मिरवणूक दगडफेक प्रकरणी ३२ जणांना अटक

0

जळगाव ;- गुरुवार २८ मार्च रोजी तालुक्यातील शिरसोली येथे रात्री ८ वाजेच्या सुमारास काढण्यात आलेल्या शिवजयंती मिरवणकीमध्ये दगडफेक करण्यात येऊन यात पोलीस कर्मचाऱ्यांसह ६ जण जखमी झाल्याचा प्रकार घडला होता . याप्रकरणी पोलिसांनी ३६ जणांवर गुन्हे दाखल करण्यात येऊन ३२ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. . दरम्यान या दगडफेकीच्या घटनेमुळे गावात पोलीस बंदोबस्त तैनात असून ताणावपूर्ण शांतता आहे. या प्रकरणी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते,उप पोलीस अधीक्षक संदीप गावित,स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक किसन नजन पाटील, एमआयडीसी पोलीस स्टेशनचे निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह त्यांच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

शिरसोली येथे दरवर्षी तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करण्यात येते. गुरुवारी संध्याकाळी मिरवणूक ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत निघाली होती. वराडे गल्ली परिसरात मिरवणूक आली असता त्या ठिकाणी काही अज्ञात समाजकंटकांनी घराच्या छतावरून दगडफेक करून शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी होमगार्ड पंकज लक्ष्मण सापकर (वय ३२, रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात मेहमूद शमशुद्दीन पिंजारी याने होमगार्ड सापकर यांच्या कपाळावर दगड मारून त्यांना जखमी केले आहे. त्यांच्या फिर्यादीवरून ३६ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

यातील चार अल्पवयीन वगळता ३२ जणांना पोलिसांनी शुक्रवारी दि. २९ रोजी सकाळी अटक केली आहे. घटनेत विशाल ज्ञानेश्वर बारी (वय २२), निलेश भगवान पाटील (वय १९), विशाल दिलीप पाटील (वय २५), मंगेश साहेबराव पाटील (वय ३०), बाळू तुळशीराम पाटील (वय ४५) यांच्यासह होमगार्ड सापकर असे सहा जण जखमी झाले .

यांच्यावर झाला गुन्हा दाखल

, मेहमुद समसोद्यीन पिंजारी,जैनुददीन शेख निजामोद्यीन , साहिल शेख भिकन , शेरु शेख बिस्मील्ला , रिसलोद्यीन ऊर्फ अदनान जैनुद्यीन शेख , इब्राहीम शह मलंग शहा, तनवीर शेख सलीम ,जुबेर शेख नबी , शहारुख शेख अल्लाउद्यीन ,वसिमखान रहिमखान, आसिफ शेख इब्राहिम शेख ,तन्वीरखान रहिमखान ,फरदिन ऊर्फ इम्रानसर शकिल शेख,अल्ताफ शेख बशिर , शेख तन्वीर शेख युनूस ,सईद लतिफ पिंजारी ,आझाद ऊर्फ आवेश मोहसीन पिंजारी ,फरीद शहा फयाजशहा , कुरबान शेख गफुर , अशपाक इलीयाज पिंजारी,अबुजर हमीद खाटीक , सैयद ऊफ्र बबलु नुरअली, तौफिक रफिक मनीयार ,दानिष सबदर खान ,रेहान सादीक मनियार, फिरोज गफार सैयद ,वाहिदखान अयुबखान ऊर्फ बाबु , अशपाक सलीम पिंजारी ,दानिश जाकीर पिंजारी ,समीर मइनोद्यीन पिंजारी ,अहमद मुबारक पिंजारी ,अजिम शेख नाजीम (सर्व रा. शिरसोली ता. जि. जळगाव) या प्रकरणी पुढील तपास सपोनी दयानंद सरवदे हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.