अवैध कट्ट्यांसह एकाला अटक; ७३ हजार ५०० किमतीचा साठा जप्त…

0

 

शिरपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क:

शिरपूर तालुका पोलिसांनी रोखली अवैध कट्ट्यांची वाहतूक, एकाला घेतले ताब्यात. कारवाईत सुमारे 73 हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल केला जप्त.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, दि. 29 सप्टेंबर रोजी दुपारी 12:45 वाजेच्या सुमारास शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांना मध्य प्रदेश राज्यातील बस क्रमांक एमपी.11 पी.6669 या बसमधून गावठी कट्ट्यांची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे मुंबई-आग्रा महामार्गावर पोलिसांनी नाकाबंदी केली. कारवाई दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार मध्य प्रदेश परिवहन महामंडळाची एक बस पोलिसांना दिसताच त्यांनी ती लागलीच थांबवून तपासणी केली, या तपासणी दरम्यान रितेश श्यामलाल शर्मा (24) रा. सोलीपेंड ता.जि जालिंदर. याच्याकडे एका बॅगमधून शिरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने पाच पिस्तुलासह चार मॅक्झिन जप्त केले. या कारवाईत सुमारे 73 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. व संबधित आरोपीला ताब्यात घेण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.