नऊपद ओळी आराधना, श्रीपाल चरित्राचे पठण मोलाचे…

0

 

प्रवचन सारांश 01-10-2022

 

आत्म्याच्या उन्नतीसाठी नऊपद ओळी आराधना आणि श्रीपाल चरित्र पठण करावे. या दिवसात जमले तसे आयंबीत करावे असे आवाहन आजच्या प्रवचनात करण्यात आले.

जळगाव येथील स्वाध्यायभवन येथे जयगच्छाधिपती 12 वे पट्टधर आचार्य श्री. पार्श्वचंद्रजी म.सा., डॉ. पदमचद्र मुनी आदिठाणा ७ यांच्या पवित्र सान्निध्यात चातुर्मास कार्यक्रम सुरू आहे. त्यात म. सा. यांच्या प्रवचनाचा लाभ असंख्य श्राविका – श्रावक घेत आहेत. 1 ऑक्टोबर पासून नऊपद ओली आराधना सुरू झाली आहे. यानिमिताने डॉ पदमचंद्र मुनी यांचे सुशिष्य जय पुरंदर मुनी यांनी विशेष प्रवचन केले. नऊ आयंबील ओळी करायची आहे, तर ते नऊ दिवसात कधी ही करू शकतो परंतु ऋतु आणि आहार यांचा जवळचा संबंध आहे. ‘चैत्र’ व ‘आश्विन’ या महिन्यातच आयंबील करण्याचे जैन धर्मात सांगितले गेले. आयंबील साधनेमुळे आध्यात्मिक व व्यक्तिगत लाभ भरपूर असतात त्यामुळे ही नऊ दिवसांची साधना करावी असे आवाहन आपल्या प्रवचनात केले.
सध्या सुरू असलेला 9 दिवसांत साधना, आराधना करावी. प्रत्येकाने इच्छेनुसार शक्य तेवढे आयंबील करावे. 9 पद मध्ये ब्रह्मांडातील उत्तम शक्ति यांचा समावेश होतो. श्रुत परंपरानुसार, आगमशास्त्रानुसार नऊपद साधनेचे काही उल्लेख आढळतात ते केल्याने लाभ मिळतात. साधकाने नऊ पद साधना करावी.
श्रीपाल यांचे चरित्र पठण, श्रवण करावे. यातील दोहे नऊ दिवस वाचावे. श्रीपाल चरित्राचे वाचन आजच्या प्रवचनात करण्यात आले. गौतम स्वामी यांना श्रेणिक राजाने प्रश्न विचारला की, नऊ पद आराधना केल्याने काय काय होतो? या प्रश्नावर गौतम स्वामी यांनी श्रीपाल यांचे चरित्र सांगितले. राजा सिंहरथ व महाराणी समयप्रभा यांनी पुत्राला जन्म दिला. त्याच वेळी पंडितजींनी त्याचे भविष्य मांगितले, की हा एकटा एक करोड सैनिकांशी लढेल इतका पराक्रमी तो असेल. राजकुमारचा जन्मोत्सव साजरा झाला. राजपुत्राचे नाव श्रीपाल ठेवते गेले. राजकुमार पाच वर्षाचा असताना राजाचा मृत्यू होतो. काल मोठा कुर असतो. आयुष्य तुटले तर बुटी ही कामी येत नाही. खुटीला बुटी नसते असे म्हटले जाते तसेच घडले. राजा सिंहरथ यांचा मृत्यू होतो. राजाचा मंत्री मतिसागर हा प्रामाणिक असतो. राजाचा उत्तराधिकारी निवडल्याशिवाय राजावर अंतिम संस्कार होणार नसतात. त्यानुसार श्रीपाल बालक आहे याचा राजतिलक करा व राजपाट तुम्ही सांभाळा असे राणी व मंत्री यांच्यात ठरते. राजाचा भाऊ वीरामन अमतो. त्याला राज्याची लालसा निर्माण होते. मी असताना या राजकुमाराला राज्य दिले. याचे त्याला वाईट वाटते. वीरगमन हा षडयंत्री असतो. सख्खा पुतण्या श्रीपालला ठार मारण्याचा विचार करतो. ‘राजेश्वरी का नरकेश्वरी’ म्हणतात ते खरे आहे. मंत्री मतिसागर यांना षडयंत्र समजते.
राजकुमार श्रीपालचे रक्षा करणे आवश्यक आहे. त्यासाठी राजणीला राज्यातून निघून जा असा सल्ला दिला गेला. रात्री बालक श्रीपालला घेऊन राणी पायी जंगलात निघाली. सकाळ झाली बालक भुकेला झाला, दूध देऊ शकत नाही याचे तिला वाईट वाटते व ती रडते. रस्त्यात एक व्यक्ती भेटतात. ते ओळखतात की हे राजघराण्यातील आहेत व संकटात आहेत. ते त्यांच्या वस्तीत राहण्याचा सल्ला देतात. ती वस्ती ७०० जणांच्या कुष्ठरोगी राहत असलेली होती. येथे राहणे आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षीत नसले तरी षडयंत्रकारी वीरगमन यापासून तरी वाचता येईल असा विचार करून कोडी व्यक्तींच्या वस्तीत राणी व राजपुत्र श्रीपाल रहायला लागतात. या कथेत पुढे काय काय घडते ते पुढील प्रवचनात सांगितले जाईल. 9 दिवस चालणाऱ्या या कथेचे श्रवण करावे असेही आवाहन प्रवचनात करण्यात आले.

———□■□■ ————
पू. डॉ. पदमचंद्रजी मुनी यांचे सुशिष्य पू. जयधुरंधर मुनी यांचे जळगावात प्रवचन सुरु असून किशोर कुलकर्णी यांनी शब्दांकन केलेली त्यांची ‘मेरी भावना’ ही प्रवचन मालिका दै. लोकशाही ~ लोकलाईव्हवर प्रसिद्ध करीत आहोत. रोजचं नवीन प्रवचन जरूर वाचा फक्त लोकशाही वर…

Leave A Reply

Your email address will not be published.