यावल येथे विजयादशमी निमित्ताने रावण दहनाचा कार्यक्रम…

0

 

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क:

विजयादशमी निमित्ताने येथील श्री छत्रपती शिवाजी मित्र मंडळाच्या वतीने विजयादशमीच्या दिवशी ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी आ. शिरीष चौधरी यांच्या हस्ते रावण दहन करण्यात येणार आहे.

परिसरातील श्री महर्षी व्यास मंदीर क्षेत्रात हा कार्यक्रम आयोजित होणार आहे. यादरम्यान कार्यक्रमात श्रीराम फाउंडेशनचे अध्यक्ष श्रीराम दयाराम पाटील, फैजपुर विभागाचे प्रांताधिकारी कैलास कडलग, उपविभागीय पोलीस उपाधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे, तहसीलदार महेश पवार, पो.नि राकेश मानगावकर, यावल नगर परिषदचे मुख्याधिकारी मनोज म्हसे, यावल पं.स. प्रभारी गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी, माजी आ. रमेश चौधरी, जि.प गटनेते प्रभाकर सोनवणे, खरेदी विक्री संघाचे संचालक आर.जी.पाटील, अमोल हरिभाऊ जावळे यांच्यासह आदी. मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमास नागरीकांना उपस्थिती राहण्याचे आवाहन रावण दहन कार्यक्रमाचे आयोजक समितीचे अध्यक्ष प्रा. मुकेश येवले यांच्यासह समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.