मल्लिकार्जुन खरगे यांचा राज्यसभा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा

0

 

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क:

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjuna Kharge) यांनी राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा (Resignation of Leader of Opposition) दिला असल्याची माहिती सूत्रांनी शनिवारी दिली. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या (एआयसीसी) अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर एका दिवसातच खर्गे यांनी हे पाऊल उचलले. 80 वर्षीय नेत्याने आपला राजीनामा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पाठवला आहे. मे महिन्यात उदयपूर येथे आयोजित ‘चिंतन शिबिर’मध्ये ‘एक व्यक्ती एक पद’ या तत्त्वानुसार त्यांनी हे पाऊल उचलले आहे.

मल्लिकार्जुन खर्गे यांनी शुक्रवारी रात्री राजीनामा सादर केल्याची माहिती सूत्रांनी दिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदाच्या शर्यतीत ज्येष्ठ नेते पी चिदंबरम आणि दिग्विजय सिंह हे आघाडीवर असल्याचे मानले जात आहे.

विशेष म्हणजे काँग्रेस अध्यक्षपदासाठी मुख्य लढत मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर यांच्यात होणार असल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले. खर्गे हे कर्नाटकातील दलित नेते असून ते या पदाचे प्रबळ दावेदार म्हणून पुढे आले आहेत. काँग्रेस अध्यक्षपदाचे तिसरे दावेदार केएन त्रिपाठी हे झारखंडचे माजी मंत्री राहिले आहेत. मात्र, या निवडणुकीत ते कमकुवत उमेदवार मानले जात आहेत.

उल्लेखनीय म्हणजे काँग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी खर्गे, थरूर आणि त्रिपाठी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.

मल्लिकार्जुन खर्गे यांनी 14 सेटमध्ये नामांकन दाखल केले आणि त्यांच्या प्रस्तावकांमध्ये अशोक गेहलोत, दिग्विजय सिंग, एके अँटनी, अंबिका सोनी, मुकुल वासनिक आणि G-23 सदस्य आनंद शर्मा, भूपेंद्र हुडा, पृथ्वीराज चव्हाण आणि मनीष तिवारी यांचा समावेश आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.