पित्रा-पुत्राला मारहाण करणाऱ्या भावंडांना दोन वर्षांची शिक्षा

0

जळगाव : पिता-पुत्राला मारहाण केल्याप्रकरणी विनोद दामू पाटील (वय ३२) व संजय दामू पाटील (वय २५) या दोघांना दोन वर्ष साधा कारावास व प्रत्येकी तीन हजार रुपये दंड अशी शिक्षा मंगळवारी न्यायालयाने सुनावली.

जळगाव तालुक्यातील रिधूर येथे दि. ११ डिसेंबर २०१५ रोजी विनोद पाटील व त्याचा भाऊ संजय पाटील या दोघांनी संदीप अशोक पाटील (वय २५, रा. रिधूर, ता. जळगाव) याला घरी येऊन मारहाण केली. तसेच यावेळी लोखंडी वस्तू मारुन गंभीर जखमी केले होते. त्या वेळी संदीपला सोडवण्यासाठी गेलेले त्याचे वडील अशोक काशीराम पाटील (वय ५५) यांना देखील मारहाण करण्यात आली होती. तसेच त्यांच्या दुचाकीचे नुकसान केले होते. या प्रकरणी अशोक पाटील यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार दोघांविरुद्धतालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

या खटल्याच्या कामकाज सुरु असतांना आठ साक्षीदार तपासण्यात आले. त्यात विनोद पाटील व संजय पाटील या दोघांना दोन वर्ष साधा कारावास, प्रत्येकी तीन हजार दंड तसेच दुसऱ्या एका गुन्ह्यात तीन महिने साधा कारावास, प्रत्येकी ५०० रुपये दंड आणि मूळ फिर्यादीस चार हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी वसीम देशमुख यांनी दिले. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील स्वाती निकम यांनी प्रभावी युक्तीवाद केला. त्यांना पैरवी अधिकारी विलास पाटील यांनी काम पाहिले.

Leave A Reply

Your email address will not be published.