सोने चांदीच्या दरात मोठा बदल, पहा आजचे भाव

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात चढ उतार सुरु आहे. या आठवड्यात सोने आणि चांदीने ग्राहकांना पहिल्या दिवशी दिलासा दिला. तर आज सोन्याच्या दरात वाढ पाहायला मिळत आहे. याची झळ ग्राहकांना बसत असली तरीही सोने खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढलेला आहे.

मार्च महिन्यात सुरुवातीला सोने 3,430 रुपयांनी वधारले. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात दरवाढीला ब्रेक लागला. या दरम्यान सोने 620 रुपयांनी घसरले. या सोमवारी, 18 मार्च रोजी सोन्यात 210 रुपयांची घसरण झाली.तर 19 मार्च रोजी सोन्याच्या किंमती 460 रुपयांनी वधारल्या. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 60,950 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 66,480 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

मार्चच्या सुरुवातीला चांदीने 3 हजार रुपयांची भरारी घेतली. चांदीत 12 मार्च रोजी 500 रुपये, 14 मार्च रोजी चांदीने 1800 रुपये तर 16 मार्च रोजी 300 रुपयांची वाढ झाली. 13 मार्च रोजी 900 रुपयांची घसरण झाली.या आठवड्यात 18 मार्च रोजी 300 रुपयांनी चांदी स्वस्त झाली. 19 मार्च रोजी तितकीच वाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव आता 77,300 रुपये आहे.

जळगाव येथील सराफा व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आजचे सोन्याचे दर 65,810 रुपये आहेत तर चांदीचे दर 75,260 रुपये आहे.

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.