बालिकेवर अत्याचार करणाऱ्याला २० वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा

0

भुसावळ विशेष न्यायालयाचा निकाल

जळगाव : केळी खावू घालण्याचे अमिष दाखवित सहा वर्षीय बालिकेला तिच्यावर अत्याचार करणाऱ्या रोहनसिंग बिल्लरसिंग बारेला (वय २०, रा. जामुनझिरा ता. यावल) या नराधमाला दोषी ठरवित २० वर्ष सक्तमजूरीची शिक्षा सुनावली. भुसावळ विशेष न्यायालयाने हा निकाल दिला आहे.

यावल तालुक्यातील जामुनझिरा येथे सप्टेंबर २०२० रोजी सहा वर्षीय अल्पवयीन बालिकेला केळी खाण्यास देण्याचे अमिष दाखवित तिला घेवून जात तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी रोहनसिंग बिल्लरसिंग बारेला याच्याविरुद्ध पोस्कोतंर्गत यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा खटला भुसावळ विशेष न्यायालयात चालविण्यात आला. यामध्ये सरकारपक्षाकडून अकरा साक्षीदार
तपासण्यात आले. तसेच सरकारी वकील अॅड. मोहन देशपांडेयांनी प्रभावी युक्तीवाद न्यायालयाने ग्राह्य धरीत रोहनसिंग बारेला याला दोषी ठरविले. सरकारपक्षातर्फे सरकारी अभियोक्ता मोहन देशपांडे यांनी कामकाज पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून भिमदास हिरे यांनी तर केस वॉच म्हणून पीसी अनिल पाटील ऐजाज गवळी यांनी मदत केली.

सरकार पक्षाकडून तपासण्यात आलेल्या साक्षीदारांमध्ये पीडीत बालिका, दुभाषक टेमरसिंग छत्तरसिंग बारेला, तलाठी मालोद, वैद्यकीय अधिकारी डॉ. जया शिंदे, डॉ. कमलाकर रेड्डी, डॉ. बाबूलाल बारेला, तपास अधिकारी पीएसआर सुनिता कोळपकर यांच्या साक्षी महत्वपुर्ण ठरल्या. भुसावळ न्यायालयात पोक्सो कायद्यांतर्गत पहिल्यांदाचआरोपीला २० वर्ष सक्तमजूरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

आरोपी रोशनसिंग बारेला याला भादवि ३६३ अन्वये ७ वर्ष सक्त मजूरी व ५०० रुपये दंड न भरल्यास एक महिना साधी कैद, भादवि कलम ३७६ (१), ३७६ (२), (एफ) (आय) तसेच पोक्सो कायदा कलम ४ व ६ अन्वये २० वर्ष सक्तमजूरी व पाचशे रुपये दंड न भरल्यास एक महिना साधी कैद, कलम ३५४ (अ) व पोक्सो कायदा कलम ८ व १२ अन्वये ३ वर्ष कैद व पाचशे रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. ही सर्व शिक्षा आरोपीला एकत्रित भोगावयाची असल्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.