वडीलांच्या उत्तरकार्यात जमा झालेला आर्थिक निधी समाज कार्यास अर्पण

0

 

शेंदुर्णी, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

शेंदुर्णी येथील संजय विसपुते व विजय विसपुते यांचे वडील स्व. मुरलीधर विसपुते (ग्रा.पं.-निवृत्त ग्रंथपाल) यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे. पारंपारिक प्रथेला फाटा देत, वडिलांच्या उत्तर कार्याप्रसंगी दुखवटा वस्त्र रुमाल टोपी न आणण्याचे आवाहन संजय विसपुते व परिवाराने समाजास केले होते, या आवाहनास प्रतिसाद देत समाजबांधव व नातेवाईक यांनी आर्थिक रोख रक्कम देऊ केली. दरम्यान यावेळी जमा झालेली संपूर्ण रक्कम विसपुते परिवाराने त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ सुवर्णकार समाज मंडळ शेंदुर्णी अध्यक्ष श्रीपाद विसपुते व खजिनदार राजेंद्र विसपुते, उपाध्यक्ष योगेश सोनार यांचेकडे समाजाच्या विकास कामासाठी सुपूर्द केली.

समाजातील गरजू घटक किंवा विकासकामात या आर्थिक निधीचा उपयोग होणार आहे. परंपरेला फाटा देत विसपुते परिवाराने समाजापुढे जो आदर्श उभा केला आहे, या कृतीचे सर्वच थरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.

उत्तर कार्यामध्ये नातेवाईक अथवा समाज बांधव यांच्याकडून मोठ्या प्रमाणामध्ये दुखावटा वस्त्र आणले जाते मात्र त्याचा वापर न झाल्यामुळे ते साचून  राहतात.मात्र त्याऐवजी आर्थिक निधीचा फायदा गरजू व्यक्तींना झाल्यास खऱ्या अर्थाने स्वर्गीय व्यक्तीला श्रद्धांजली ठरेल असा मानस आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.