इर्शाळवाडीत मदतकार्य थांबले, पावसामुळे अडचण

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

रायगडच्या इर्शाळवाडीत दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत सुमारे सुमारे ५० घाट मातीच्या ढीगाऱ्याखाली गाडली गेली आहे. बुधवारी रात्री ११ च्या सुमारास हि घटना घडली. दरम्यान, गुरुवारी पहाटेपासून ते आत्तापर्यंत इथे अविरतपणे बचावकार्य सुरु होते.

पण, आता हे बचावकार्य तात्पुरतं थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या परिसरात सध्या मुसळधार पाऊस सुरू असल्यानं हे बचावकार्य थांबविण्यात आलं आहे. सध्या हि परिस्थिती बचावकार्यासाठी प्रतिकूल परिस्थिती आहे. मुसळधार पाऊस होत असल्याने एनडीआरएफ, अग्निशमन दल, आणि स्थानिक प्रशासनाला बचाव कार्य राबवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळं आजचं बचावकार्य थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उद्या सकाळी परिस्थिती पाहुन पुन्हा एकदा बचावकार्य सुरु करण्यात येणार असल्याची सुत्रांनी माहिती दिली आहे.

१२ जणांचा मृत्यू १०३ बचावले 
आज सकाळपासूनच मदतकार्य सुरु करण्यात आलं. या दुर्घटनेत आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १०३ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. तर अजूनही १५० लोक या ढीगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली आहे. तसेच भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार रायगड जिल्ह्यात आज व उद्या रेड अलर्ट जरी करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.