शेंदुर्णीत शरद पवारांच्या निर्णयाचे राष्ट्रवादीच्या वतीने जल्लोष करून स्वागत…

0

 

शेंदुर्णी, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेतल्यामुळे शेंदुर्णी येथील राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या व कार्यकर्त्यांच्यावतीने फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला.

यावेळी शेंदुर्णी येथील राष्ट्रवादीचे संजय गरुड व सगरमाल जैन यांनी आनंद व्यक्त केला व कार्यकर्त्यांना संबोधित केले. या प्रसंगी डॉ.किरण सूर्यवंशी, शांताराम गुजर, राजेंद्र पवार, दगडु गुजर, नंदु बारी, अशोक माळी, खलील शेठ, मन्सुर पिंजारी, फारुख खाटीक, प्रविण गुजर, महिंद्र चौधरी, जयपाल गरुड, मनोज पाटील, योगेश गुजर, विठ्ठल गरुड, प्रदीप धनगर, शंतनु गरुड, गजानन बारी, बशीर खाटीक, महविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सार्वजनिक वाचनालय चौकात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येऊन पेढे वाटत आनंद व्यक्त करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.