बापरे ! शेतीच्या वादातून बापाला पाठवले यमसदनी

0

शेंदुर्णी, लोकशाही न्यूज नेटवर्क  

 

शेंदुर्णी येथील तरंगवाडी शिवारात वाटणीच्या वादातुन मुलाने बापाच्या डोक्यात पावडे घालुन यमसदनी पाठविल्याची धक्कादायक घटना घडली असून आरोपी मुलगा फरार आहे. तर आरोपीच्या मुलाने बापा विरोधात फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, येथील शेतकरी मयत नाना बडगुजर (वय ८२) हे सकाळच्या सुमारास शेतात कपाशी वेचत होते. ९ वाजेच्या सुमारास त्यांचा मुलगा आरोपी कैलास नाना बडगुजर (वय ५६) हा शेतात आला आणि वडीलांसोबत वाटणीवरून वाद घालू लागला. वडीलांनी नकार दिला असता त्यांच्यात शाब्दीक वाद झाला आणि आरोपी कैलास याने वडील नाना बडगुजर यांच्या डोक्यात भुसा भरण्याच्या पावडयाने डोक्यात जोरात वार करताच नाना बडगुजर हे जागेवरच कोसळले.

आरोपीचा मुलगा आणि त्याची पत्नी शेतात काम करीत होते. विशाल याने डोक्यात वार केल्याचे बघताच धाव घेत आरोपी वडीलांच्या हातुन पावडे हिसकावून जखमी बाबांना सावरण्याचा प्रयत्न केला. ते कोणतीही हालचाल करीत नसल्याचे बघुन आरोपी याने शेतांमधुन पळ काढला. दरम्यान घटनेची माहिती वाऱ्यासारखी गावात पसरल्याने घटनास्थळी धाव घेत पोलीसांना खबर दिली.

शेंदुर्णी दुरक्षेत्रचे पोलीस निरीक्षक दिलीप पाटील, शशिकांत पाटील पोकाँ. प्रशांत विरनारे, शशिकांत पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत मयत यांना पहुर ग्रामिण रुग्णालयात हलविले आणि घटना स्थळाचा पंचनामा करीत साहित्य ताब्यात घेतले. तसेच आरोपी मुलगा कैलास बडगुजर याचा शोध सुरु असुन पथके रवाना करण्यात आली आहेत.

सदर घटनेची फिर्याद आरोपीचा मुलगा विशाल कैलास बडगुजर (वय ३३) याने दिलेल्या फिर्यादीवरून भादवी कलम ३०२ नुसार गुरं ४९१ / ३०२ नुसार पहुर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय दिलीप पाटील करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.