मोठा निर्णय ! कैद्यांना पाणीपुरी, आईस्क्रीमसह ‘या’ गोष्टी मिळणार

0

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क 

तुरुंगातील कैद्यांसाठी दिलासादाक बातमी आहे. आपल्याला माहितीच असेल की कैद्यांना कारागृहात अॅल्युमिनिअमच्या थाळीत पाणीदार डाळ आणि भात खायला देतात. पण आता कैद्यांना चक्क आइस्क्रिम, पाणीपुरी खायला मिळणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तुरुंगातील कँटिनच्या यादीत 173 नव्या पदार्थांची भर पडली आहे. यात चाट मसाला, लोणचं, ताजं पाणी, चेस बोर्ड, ओट्स, कॉफी पावडर, लोणावळा चिक्की, शुगर फ्री स्वीटनर, आईस्क्रीम, सेंद्रिय फळं, पीनट बटर, पाणीपुरी, आर्ट बुक्स, कलरिंग मटेरियल या वस्तूंची यादी करण्यात आली आहे.  मात्र यासाठी कैद्यांना पैसै मोजावे लागणार आहेत.

तसेच फेस वॉश, केसांचा रंग इत्यादी वैयक्तिक काळजीच्या वस्तूंचाही समावेश आहे. धूम्रपान करण्याची इच्छा कमी करण्यासाठी निकोटीन-आधारित गोळ्यांना देखील परवानगी आहे. हा निर्णय कैद्यांसाठी दिलासादायक बाब ठरणार आहे. कैद्यांना विविध अन्न पर्याय उपलब्ध करून देऊन त्यांच्या आरोग्यावर सकारात्मक बदल घडावा यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकारी अमिताभ गुप्ता यांनी दिलीये.

 फोनवर बोलण्याची सुविधा

कारागृहातील कैद्यांना कारागृहातून आपल्या कुटुंबीयांशी फोनवर बोलण्याची सुविधा लवकरच उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासाठी सरकारकडून परवानगी मिळताच महाराष्ट्रातील सर्वच कारागृहामध्ये कैद्यांना कुटुंबीयांशी बोलण्यासाठी टेलिफोनिक सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. प्रत्येक कैद्याला त्याच्या कुटुंबीयांशी आठवड्यातून एकदा दहा मिनिटापर्यंत बोलू दिलं जाणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.