मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने लोकसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर झाली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत ही यादी वाचून दाखवली. यामध्ये वर्धा – अमर काळे, दिंडोरी – भास्कर भगरे, बारामती – सुप्रिया सुळे, शिरूर – डॉ. अमोल कोल्हे, अहमदनगर – नीलेश लंके हे मतदारसंघ आणि उमेदवारांचा समावेश आहे. तसे पक्षाची पुढील यादी आणि उमेदवारांची नावे लवकरच जाहीर केली जातील, अशी माहिती जयंत पाटील यांनी सांगितलं आहे.
लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊन 15 दिवस झाल्यानंतर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या लोकसभा उमेदवारांची पहिली यादी शनिवारी जाहीर झाली. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला महाविकास आघाडीत 10 जागा मिळण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीतील तीन घटक पक्षात काही जागेवरून मतभेद आहेत.
काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे गटाने काही जागांवरील उमेदवारांची घोषणा करीत आघाडी घेतली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाने चार दिवसांपूर्वी 17 उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची पहिली यादीची घोषणा पत्रकार परिषद घेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उमेदवारांची नावे जाहीर केली.