लोणावळा ;- पॉर्न व्हिडिओ तयार करणाऱ्या टोळीला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. लोणवळ्यातील एका बंगल्यावर हा गोरख धंदा सुरू असल्याने याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी 13 जणांना ताब्यात घेतले आहे . . लोणावळ्यातील आर्णव व्हील या बंगल्यात हा प्रकार सुरु होता.या ठिकाणी पॉर्न शूट करण्यासाठी लागणारा कॅमेरा आणि इतर साहित्य जप्त केलं आहे. त्यांच्याकडून शूट करण्यात आलेले काही पॉर्न व्हिडिओ ही जप्त केले आहेत.
या प्रकरणी वेगवेगळ्या अश्लील ओ.टी.टी प्लॅटफॉर्मसाठी काही तरुण आणि तरुणी लोणावळ्यातील व्हीलावर पॉर्न व्हिडिओ तयार करत होते. भारतात पॉर्न व्हिडिओ तयार करणे कायद्याने गुन्हा आहे. पॉर्न व्हिडिओ करण्यावर बंदी आहे. असे असताना ही १५ जणांची टोळी लोणावळ्यात बिनधास्त पॉर्न व्हिडिओ तयार करत होती.
भारतात पॉर्न व्हिडिओ बनवणे कायद्याने गुन्हा आहे. असे व्हिडिओ बनवणे बंदी आहे.या सर्व आरोपीविरुद्ध लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात भादवि. कलम 292,293,34. माहीती तंत्रज्ञान अधिनियम 2008 कायदा कलम 67,67 (A), स्त्रियांचे असभ्य प्रतिरुपन अधिनियम 1986 कायदा कलम 3,4,6,7.अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करण्यात आला आहे. लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.