राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याहस्ते भारत रत्न पुरस्कार प्रदान

0

नवी दिल्ली ;- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव, चौधरी चरण सिंग, कर्पूरी ठाकूर आणि एमएस स्वामीनाथन यांना मरणोत्तर भारतरत्न प्रदान केले. माजी उपपंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनाही भारतरत्न देण्यात येणार आहे. मात्र, त्यांची तब्येत आणि वय पाहता, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू स्वत: रविवारी त्यांना त्यांच्या निवासस्थानी भेटून हा सन्मान प्रदान करणार आहेत.

दिवंगत माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव यांचा पुरस्कार त्यांचे पुत्र पीव्ही प्रभाकर राव यांनी स्वीकारला. चौधरी चरणसिंग यांचे नातू जयंत सिंह यांनी दादांचा पुरस्कार स्वीकारला. यासोबतच एमएस स्वामिनाथन यांची मुलगी नित्या रावही पुरस्कार स्वीकारण्यासाठी कार्यक्रमाला पोहचल्या होत्या.

राष्ट्रपती भवनातीलच दरबार हॉलमध्ये शनिवारी भारतरत्न पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह अनेक बडे नेते आणि व्यक्तिमत्त्व या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.