थकबाकी न भरणाऱ्या मालमत्ताधारकांना १ एप्रिलपासून वार्षिक २४ टक्के शास्ती (दंड) लागू होणार

0

जळगाव :  मनपा आयुक्तांनी थकीत रकमेवरील १०० % शास्ती (दंड) माफीची अभय योजना दि. ८ फेब्रुवारीपासून सुरू केलेली आहे. शहरातील मालमत्ता मिळकत थकबाकी धारकांना थकबाकी वसुलीचा जास्तीत जास्त भरणा करता यावा याकरिता या अभय योजनेची शेवटची मुदत दि. ३१ मार्च असून यामुदतीपर्यंत थकबाकी न भरणाऱ्या मालमत्ताधारकांना १ एप्रिलपासून वार्षिक २४ टक्के शास्ती (दंड) लागू होणार आहे.

मनपा आयुक्त यांनी शास्ती माफीची अभय योजना लागू केल्यापासून या योजनेस नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे वर्षभरात २०४ कोटींच्या मागणीपैकी १०३ कोटी रुपयांची वसुली झाली आहे. यामध्ये चालू वर्षीच्या ८५ कोटी ७२ लाखांपैकी ६० लाखांची वसुली झाली असून मागील थकबाकी ११८ कोटी ३८ लाख पैकी ४३ लाख रुपयांची वसुली झाली आहे. मात्र, अजूनही शहरातील ५९ हजार मालमत्ताधारकांकडे १०० कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे सदर मालमत्ताधारकांनी तातडीने दोन दिवसात मालमत्ता कर भरावा अन्यथा त्या मालमत्ताधारकांना १ एप्रिल पासून वार्षिक २४ टक्के शास्ती आकारण्यात येणार आहे. तसेच ज्या मालमत्ता धारकांवर एका वषर्षांपेक्षा जास्त थकबाकी असेल किंवा मोठ्या रक्कमेची थकबाकी असेल अशा थकबाकदारांच्या मालमत्ता जप्त करून त्यांचे लिलाव केले जाणार आहेत.

अभय  योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. तसेच दि. ३० मार्च व ३१ मार्च रोजी शनिवार-रविवार असून शासकीय सुट्टी असल्यावर सुद्धा प्रभाग समिती क्रमांक १ ते ४ ची प्रभाग समिती कार्यालय सुरू राहणार आहेत.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.