निजामपूर, लोकशाही न्युज नेटवर्क
साक्री तालुक्यातील निजामपूर येथे बऱ्याच दिवसापासुन पाणीपुरवठा करतांना ग्रामपालिका अपयशी ठरत आहे. निजामपूर पाणी प्रश्नाबाबत जलजिवन मिशनचे उपअभियंता हरिशचंद्र पवार यांच्याशी आज चर्चा करण्यात आली.
दि.1 एप्रिल सोमवार रोजी पाणी पुरवठाचे कनिष्ठ अभियंता व या कामावर देखरेख ठेवणारी नाबार्ड संस्थेतील अधिकारी येऊन मेन रोड वगळता जेथे पाईप लाईनचे प्रश्न आहेत ते सोडविले जातील. भावसार गल्ली, मंदिर गल्ली, ब्राम्हण गल्ली, चैनी रोड, मारूती गल्ली, कुंभार वाडा, मशीद ते गांधी चौक या ठिकाणी तात्पुरती पाईप लाईन चा सर्वे करण्यात येऊन युध्द पातळीवर काम सुरू होईल.
तसेच गावातील साखर झिरा व सिध्दी कॉलनीची बोरवेल्स दुरूस्त करण्यात येतील. या चर्चेत दुरध्वनीतून सा.बा.विभागाचे उपअभियंता विनोद वाघ, ग्रामविकास अधिकारी राहुल मोरे, पत्रकार हर्षद गांधी, हेमंत महाले, परवेज सैय्यद, आकबर पिंजारी यांचीही उपस्थिती होती. प्रा. नरेंद्र तोरवणे यांनी पाणीपुरवठा विभागाशी चर्चा सर्वानुमते केली.
सार्वजनिक विभागाने सांगितले की,15 दिवसात आम्ही या रस्त्याचे काम पूर्ण करून मेन रोड वरील पाणीपुरवठा योजना काम करणार आहे. मुख्य जलवाहिनी वर असलेले कनेक्शन, फिल्टर प्लांट वरून असलेले कनेक्शन तसेच 24 तास नळ कनेक्शन, डबल कनेक्शन हे देखील तपासले जाणार आहेत. तसेच निजामपूर ग्रामपालिकाचे आरओ फिल्टर मशिन का बंद आहे ते सुरु करण्याबाबत चर्चा करण्यात येणार आहे.