हायवेमध्ये उभ्या विजेच्या १३ खांबांना अजून किती दिवस मिळणार जीवदान..!
हायमास्ट दिव्यांच्या खांबांना नवीन जागा हवी
निजामपूर, लोकशाही न्युज नेटवर्क
निजामपूर गावात सरवड-ब्राह्मणवेल या राज्य मार्ग क्र १३ चे मेन रोडवर बांधकाम सुरू आहे. १९६७ पासूनचे विजेचे लोखंडी खांब नेमके या मार्गात उभे आहेत. ट्राफिक सुरू होईल तेव्हा अडथळा देतील. ते कधी काढले जातील असा सवाल वाहनधारक करीत आहेत.
आझाद चौकात उभारलेला हायमास्ट दिव्यांचा खांब देखील रस्त्यात आहे. तो हटविणे देखील गरजेचे झाले आहे. पूर्वी पेक्षा हा रस्ता रुंद होत आहे. त्यामुळे ५७ वर्षांपासूनचे वीजेचे खांब आता रस्त्यात आलेत. असे एकंदर १३ विजेचे खांब या रस्त्यात येतात. पैकी ८ खांब तेथून सरकवले जाणे जरुरी ठरते.
अन्यथा नवीन काँक्रीट रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांसाठी ते धोकेदायक ठरतील. अपघातास आमंत्रण ठरतील अशा विजेच्या “त्या” खांबांना अजून किती दिवस जीवदान मिळणार असा सवाल केला जात आहे.
निजामपूर गावातील हे १३ पोल एजन्सी हटविणार
११ मीटर उंचीचे पोल असतील. त्यावर दोघा सर्किटला १२०ची केबल बसविली जाणार असल्याची माहिती कनिष्ठ अभियंता हेमंत ठाकूर यांनी दिली.