‘त्या’ व्हायरल झालेल्या फोटोप्रकरणी शरद पवारांनी व्यक्त केली नाराजी !

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे शनीवारी गुजरातच्या अहमदनगरमध्ये होते. गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या एका कार्यक्रमासाठी त्यांनी हजेरी लावली होती. त्यानंतर त्यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून प्रफुल पटेल (Praful Patel) यांच्याबाबत भाष्य केले. शरद पवार हे शनिवारी गौतम अदानी यांच्या एका कंपनीच्या उद्घटनासाठी गेले होते.

दरम्यान, संसदेच्या विशेष अधिवेशनादरम्यान शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्या एकत्रित फोटोची खूपच चर्चा झाली. राज्यात एकमेकांविरोधात बोलायचं, टीका करायची आणि दिल्लीमध्ये एकत्रित फोटो काढायचा, यामुळे संपूर्ण राजकारणात हा विषय जोर धरून आहे. या फोटोमुळे झालेल्या चर्चांना एकप्रकारे शरद पवार यांनी स्वतः उत्तर दिले आहे.

काय म्हणाले शरद पवार?
शरद पवार म्हणाले की, महत्वाची पद देऊनदेखील प्रफुल पटेल अजित पवार यांच्यासोबत गेले. पक्षातल्या काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली असली तरी, पक्ष म्हणून मजबुतीने काम सुरु असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, अजित पवार यांच्या बंडानंतर हे खरंच बंड आहे का? असा प्रश्न पडावा, अशा घटना नेहमी घडतात. दोन्ही गटाचे नेते एकमेकांसोबत हात मिळवतात, गप्पा मारतात, हितगुज साधतांना दिसतात. स्वतः शरद पवार आणि अजित पवार यांनी पुण्यामध्ये एक बैठकही झाली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेमकं काय चाललंय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.