कांद्याची १०० कोटींची उलाढाल ठप्प, बंदमुळे कांदा उद्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान

0

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क

जिल्ह्यात कांदा प्रश्न चांगलाच पेटला असून, शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर व्यापारी संघटनांनी पुकारलेल्या ‘बंद’मुळे गत पाच दिवसांत कांदा लिलाव न झाल्याने जिल्ह्यात ७.५ लाख क्विंटलवर आवक तुंबली आहे, तर तब्बल १०० कोटींवर उलाढाल ठप्प झाली. कांदा लिलाव होत नसल्याने कांदा सडत असून, त्यात पावसाची भर पडली आहे. याचा जबर फटका कांदा उद्पादक शेतकऱ्यांना बसत आहे.

गणेश चतुर्थी व त्यानंतर २० सप्टेंबर पासून नाशिक जिल्हा व्यापारी असोसिएनचे राज्य व क्रेंद्र सरकारकडे केलेल्या मागण्या मान्य होईपर्यंत लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय उद्पादकांनी घेतल्याने संपूर्ण कांदा बाजार विस्कळीत झाला आहे. पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांनी गुरुवारी घेतलेल्या बठकीत कोणत्याच प्रकारचा तोडगा निघाला नाही.

व्यापारी संघटनेच्या बैठकीत झाला ‘हा’ निर्णय
केंद्र सरकार महाराष्ट्रातील कांद्याबाबत उदासीन असून, निर्यातशुल्क वाढवून व्यापाऱ्यांवर अन्याय करत आहे. तो कदापि सहन केला जाणार नाही, अशी भूमिका व्यापाऱ्यांनी घेत जोपर्यंत राज्य सरकार ठोस निर्णय घेत नाही, तोपर्यंत कांदा लिलावात सहभागी होणार नाही, बंद असाच सुरु राहील, असा एकमुखी निर्णय व्यापारी संघानेच्या बैठकीत घेण्यात आला आहे. व्यापाऱ्यांनी बंडाचा निर्णय कायं ठेवल्याने पाच दिवसांपासून बाजार समित्यांमध्ये कायद्यांचे लिलाव होऊ शकलेले नाहीत.

यापूर्वी उत्पादन खर्चाच्या खालील दराने विक्री करण्याची वेळी आली, तर आता विक्री व्यवस्था अडचणीत आल्याने दुहेरी फटका शेतकऱ्यांनाच सोसावा लागतो. कांद्याची आवक बाजार होत नसल्याने शेतकऱ्यांच्या चाळीत कांडा सडत आहे. यातच जिल्ह्यात पाऊस सुरु झाला. त्यामुळे हवामानात बदल होत आहे. याचा फटका कांदा सडण्याच्या वेगवाढीवर होत असल्याने शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.