लोकशाही न्यूज नेटवर्क
आशियाई क्रीडा स्पर्धांना (Asian Games) प्रारंभ झाला असून, पदकांची कमाईत भाताचे खातेही उघडले आहे. अर्जुन आणि अरविंद या जोडीने रौप्यपदक पटकावले आहे. त्याचबरोबर महिला नेमबाजी संघानेही रौप्य पदकाची कामे केली आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाचे रौप्य पदकाची जवळजवळ निश्चितच आहे.
हॉकी संघाचा मोठा विजय
भारताच्या पुरुषज हॉकी संघाने स्पर्धेतील त्यांच्या पहिल्या सामन्यात मोठा विजय मिळवला. भारताने उझबेकिस्तान संघाचा १६-०बने पराभव केला. या सामन्यात भारतासाठी तीन खेळाडूंनि हॅट्ट्रिक घेतली.
भारताला मिळाले ५ वे पदक
नेमबाजीत भारताला आणखी एक पदक प्राप्त झाले आहे. रमिताने १० मीटर एअर रायफलमध्ये कांस्यपदक पटकावले आहे. नेमबाजीत भारताचे हे दुसरे पदक आहे. आत्तापर्यंत भारताने ३ रौप्य आणि २ कांस्य अशी एकूण ५ पदके आपल्या नवे केली आहे.