जळगाव : मागील सोळा वर्षांपासून जळगाव जिल्ह्यातील गुणवंत, आर्थिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक जीवन प्रकाशमान करण्याचे कार्य एसडी-सीडच्या अध्यक्षा सौ. रत्नाभाभी जैन आणि कार्याध्यक्षा मीनाक्षीताई जैन यांच्या मार्गदर्शनाखाली अविरतपणे सुरु आहे. जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांना उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण मिळावे तसेच युवतींचे सक्षमीकरण करून त्यांनी सक्षम व स्वयंपूर्ण व्हावे, हा व्यापक दृष्टीकोन समोर ठेवून वेगवेगळे उपक्रम एसडी-सीड मार्फत राबविले जात आहेत.
त्याचाच एक भाग म्हणून रोज घडणारे महिलांवरील अत्याचार, त्यांचे शारीरिक, मानसिक शोषण यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे आणि या सर्वांना कुठेतरी थांबविणे अत्यंत महत्वाचे आहे. अशा विदारक परिस्थिती मध्ये युवतींना योग्य दिशा मिळावी, त्यांना शारीरिक, मानसिक, भावनिक दृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी मदत व्हावी या उद्देशाने सुरेशदादा शैक्षणिक व उद्योजक विकास योजना म्हणजेच एसडी सीड तर्फे “स्मार्ट गर्ल” (युवती सशक्तीकरण) या दोन दिवसीय मार्गदर्शनपर शिबिरांचे आयोजन महाराणा प्रताप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे करण्यात आले होते. यात इयत्ता दहावी ते बारावीच्या सुमारे ५२ विद्यार्थिनींनी शिबिराचा लाभ घेतला.
महिला सक्षमीकरण कार्यक्रमांतर्गत युवतींसाठी आयोजिलेल्या या शिबिरात तज्ञ मार्गदर्शक श्री रत्नाकर महाजन, हिंगोली यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. दोन दिवसीय शिबिराला विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. डी. एस. पाटील, पर्यवेक्षक डी. बी. सोनवणे, एसडी-सीड समन्वयक श्री. प्रवीण सोनवणे, श्रीमती मायाश्री पाटील, श्री. संजय पाटील, श्री. साहेबराव पाटील, श्री. किरण चौधरी, श्रीमती. शिल्पा पाटील, श्रीमती जयश्री मोरे, श्रीमती टीना चौधरी हे उपस्थित होते.
या शिबिरात महाजन यांनी खालील गोष्टींवर मार्गदर्शन केले.
1) आत्मजाणीव, संवादचा अभाव आणि नाते संबंध,
2) आत्मसन्मान व स्व-संरक्षण,
३) दोन पिढ्यांमधील वाढता दुरावा,
४) मैत्रीचे चांगले-वाईट परिणाम,
५) मुली-मुलांमधील शैक्षणिक विकासातील तफावत,
६) वैवाहिक जीवनाबद्दल योग्य मार्गदर्शनाचा अभाव,
७) आंतरजातीय विवाह व घटस्पोटाची वाढती संख्या,
८) मोबाईल व इंटरनेट चा वाढता प्रभाव
शिबिराच्या दुसऱ्या दिवशी विद्यार्थिनी बरोबरच त्यांच्या पालकांशी देखील हितगुज केले. यात पालकांनी आपल्या लेकीला बाह्य जगाच्या आकर्षणा पासून लांब ठेवायचे असेल तर तिचे चांगले मित्र व्हा असा मोलाचा सल्लाही पालकांना दिला.
हे शिबीर यशस्वी होण्याकरिता विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. डी.एस. पाटील विद्यालयाचे व्यवस्थापन यांच्याबद्दल एसडी-सीड गव्हार्निग बोर्ड चेअरमन डॉ प्रसन्नकुमार रेदासनी यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.