जळगाव ;- खासदार राहूल गांधी यांच्या उपस्थितीत लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा तथा आदिवासी नेत्या व सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभाताई शिंदे यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
जळगाव जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्या तथा आदिवासी नेत्या प्रतिभा शिंदे यांचा अखेर कॉंग्रेसमध्ये प्रवेश झाला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून याबाबत सुरू असलेल्या चर्चेला यातून पूर्णविराम मिळालेला आहे. त्यांनी काल अर्थात २० डिसेंबर रोजी दिल्ली येथे कॉंग्रेस पक्षाच्या मुख्य कार्यालयात खासदार राहुल गांधी व कॉंग्रेसचे महासचिव के.सी. वेणूगोपाल यांच्या उपस्थितीत भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षात प्रवेश घेतला.
प्रतिभाताई शिंदे यांच्या माध्यमातून कॉंग्रेस पक्षाला जळगाव जिल्ह्यात एक आक्रमक चेहरा मिळाला आहे. त्यांना प्रदेश पातळीवरील महत्वाचे पद देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.