भरधाव दुचाकींची सामोरासमोर धडक, २ जण जागीच ठार

0

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क

एरंडोल तालुक्यातील कासोदा येथून जवळ असलेल्या अंतुर्ली खुर्द शिवारात भरधाव दोन दुचाकींची सामोरासमोर धडक झाली. या अपघातात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. तर महिला जखमी झाली आहे. महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सदर अपघात १९ डिसेंबरला रात्रीच्या सुमारास घडला आहे. यात कासोदा येथील अमोल मांगीलाल भोई (रा. उत्राण) हा दुचाकीने उत्राणकडे जात होता. त्यावेळी निपाणेकडून वासुदेव गोरख पाटील हा त्याच्या दुचाकीवर कासोद्याकडे निघाला होता. दरम्यान, अंतुर्लीजवळ आयटीआयजवळ दोघा दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. दोघेही यात मृत्युमुखी पडले. रात्रीच्या वेळ असल्याने लवकर मदत मिळू शकली नाही.

दुचाकीवरील महिला जखमी
या अपघातात एका दुचाकीवर मागे बसलेली अंतुर्ली येथील महिला जखमी झाली आहे. या महिलेला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत कासोदा पोलीस ठाण्यात घटनेटबाबत नोंद करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस फौजदार रवींद्र पाटील हे तपास करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.