जभरात ट्विटरची सेवा ठप्प, युजर्सचा होतोय संताप

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

गुरुवारी सकाळी लोकप्रिय मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म असलेल्या X ची सेवा जागतिक ठप्प झाली आहे. X वापरतांना युजर्सना कोणत्याही टॅबवर कोणतेही ट्विट दिसत नव्हते. हजारो युजर्स याबाबत तक्रार केली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांचे ट्विट रिफ्रेश होत नव्हते.

तसेच जाणतेही ट्विट करतांना Welcome to X असा मेसेज युजर्सना येत आहे. त्यामुळे नेटकरी हैराण झाले आहे. ट्विट्स युजर्सना, प्लॅटफॉर्मवर वारंवार ‘cannot retrieve tweets’ असा एरर दाखवत होता. यावर्षी चौथ्यांदा युजर्सला या समस्येला सामोरे जावे लागले आहे. वापरताना फॉलोइंग, फॉर यू आणि लिस्टसह (List) सर्व टॅब डाउन होते. Down Detector डेटानुसार ४७ हजाराहून अधिक यूएस वापरकर्त्यांना X आणि X pro च्या समस्यांचा सामना करावा लागतो आहे.

ही समस्या अजून किती काळ असेल हे सांगता येत नाही. यापूर्वी ही समस्या जुलै महिन्यात आली होती. ज्यामुळे ट्विटरच्या अनेकलिंक्स ओपन करतांना अडचणींचा सामना करावा लागत होता. तसेच नवीन ट्विट करतांना युजर्सला एक पॉप-अप मिळत आहे. एलॉन मस्क यांनी ट्विटरचा ताबा घेतल्यापासून मागच्या वर्षभरात ट्विटरच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागले आहे. मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर ट्विटरचा ताबा घेतल्यापाऊण अनेक वेळा अशा समस्यांचा सामना करावा लागत आहे. मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटर एक्सचा सर्व्हर मागील काही वेळापासून डाउन झालं आहे. तसेच ट्विटर वापरण्यास अडथळे येत असल्यामुळे नेटकरी संतापले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.