जळगाव जिल्ह्यातील अनुष्का कुमावतला अमेरिकेच्या विद्यापीठाची सव्वा दोन कोटींची शिष्यवृत्ती…

0

 

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

तामसवाडी येथील रहिवासी ह.मु. पुणे, भोसरी व चाळीसगाव शहराचे रहिवासी बाळासाहेब मारुती कुमावत यांची नात व छायाचित्रकार कुणाल कुमावत यांची भाची अनुष्का कुमावत हिला अमेरिकेच्या प्रसिद्ध ओहायो वेसलियान विद्यापीठाची दोन कोटी पंचवीस लाख रुपयांची स्कॉलरशिप मिळाली असून, अनुष्का बारावी नंतरचे शिक्षण सदर विद्यापीठात घेणार आहे.

अनुष्का खगोलशास्त्राचा व आर्टिफिशिअल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ताचा पदवी अभ्यासक्रम करणार आहे. एकाच वेळी खगोलशास्त्र व आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा अभ्यास करून अनुष्का ने अमृत संयोग साधला आहे. खगोलशास्त्र व आर्टिफिशियल इंटेलिजन्स ची सांगड घालून मानव कल्याणासाठी नवीन संशोधन करण्याचा अनुष्काचा मानस आहे. अनुष्का आपल्या यशाचे श्रेय आई-वडील व तिच्या शिक्षकांना देते. अनुष्का चे वडील शरद साहेबराव कुमावत हे नौकरी निमित्ताने भोसरी पुणे येथे स्थायिक आहेत. आपल्या जिद्दीने कु. अनुष्काने शिक्षणाचे धडे गिरवत आज परदेश गाठले आहे.

अभ्यासासाठी विद्यापीठाकडून दोन करोड पंचवीस लाख रुपये इतकी स्कॉलरशिप मंजूर झाली आहे. सदर स्कॉलरशिप साठी कु. अनुष्का हिने खूप मेहनतीने व जिद्दीने 18 तास अभ्यास करून स्वतःचे स्वप्न पुर्ण करण्याच्या जिद्दीने हे यश संपादन केल्याचे अनुष्का चे वडील शरद कुमावत यांनी सांगितले. अनुष्का अमेरिकेत शिक्षणासाठी जाणार असल्याची बातमी तामसवाडीत कळताच तिच्यासह तिच्या कुटुंबीयांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.