गावठी दारू कायमची बंद करण्यासाठी यावल पोलीसांना निवेदन…

0

 

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

यावल तालुक्यात मोठया प्रमाणावर सर्रासपणे बेकायद्याशीर विक्री होणाऱ्या गावठी हातभट्टीची व पन्नीच्या दारूमुळे अनेक कुटुंब उद्धवस्थ झाले आहे. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी प्रशासनाला दिलेल्या आदेशाला व आवहानास पाठींबा देण्यासाठी यावल येथे सर्वपक्षीय पदाधिकारी एकवटले त्यांच्या शिष्टमंडळाच्या वतीने पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांची भेट घेवुन विविध प्रकारच्या सार्वजनिक ठिकाणी दारूला कायमची बंदी करावी या संदर्भातील मागणीचे निवेदन दिले आहे.

 

यावल तालुक्याची भौगोलिक रचना ही ग्रामीण भागाची असुन, बहुतांश नागरीक हे शेतकरी आणि शेतमजुर आहेत. रोज कामावर जावुन हात मजुरीवर आपल्या कुटुंबाचा उदरनिवार्ह चालविणारे आहेत. अशा परिस्थित यावल तालुक्यात सर्वत्र गावठी दारू व अत्यंत घातक रसायन टाकुन पन्नीची दारू तयार करून ती मोठया प्रमाणावर विक्री करण्यात येत असुन, सहज मिळणाऱ्या या दारूच्या आहारी जावुन व्यसनाधिन होवुन वेग वेगळे आजार होवुन त्यांचे जिवन व कटुंबाचे संसार उद्धवस्त होत आहे . तरी आपल्या पोलीस प्रशासनाच्या वतीने यावल तालुक्यात सर्वत्र राजरोजसपणे विक्री होणाऱ्या हातभट्टीची गावठी दारू व घातक रसायनची पन्नीची दारू विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करीत कायमची ही विक्री बंद करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.