दोन हजारांच्या 2.72 ट्रिलियन किमतीच्या नोटा परत

0

नवी दिल्ली;- देशात दोन हजार रुपयांच्या नोटा बंदी केल्यानंतर आतापर्यंत३० जूनपर्यंत २.७२ ट्रिलियन रुपये किमतीच्या २,००० रुपयांच्या नोटा बँकिंग प्रणालीत परत आल्या आहेत, अशी माहिती अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात दिली.

भारतीय रिझर्व्ह बँकेने २,००० रुपयांच्या नोटेबाबत १९ मे रोजी मोठा निर्णय घेतला असून, ती वितरणातून बाहेर काढण्यात आली आहे. ३० सप्टेंबरपर्यंत कोणताही नागरिक बँकांमध्ये जाऊन या नोटा बदलून घेऊ शकतो आणि तोपर्यंत या नोटा कायदेशीर टेंडरमध्ये राहतील, अशी माहितीही आरबीआयने दिली होती. आता सरकारने २००० रुपयांच्या नोटेबाबत बरीच माहिती मिळाली आहे. ३० जूनपर्यंत २.७२ ट्रिलियन रुपये किमतीच्या २,००० रुपयांच्या नोटा बँकिंग प्रणालीत परत आल्या आहेत, अशी माहिती अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.