हृदयद्रावक; आजारी आजीला भेटायला गेला; आणि आजीसह जगातून नातूही गेला…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

जिल्ह्यातील फैजपूर येथे एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. आपल्या गावातच राहणाऱ्या आजीची प्रकृती खालावल्याची बातमी कळताच २४ वर्षीय नातू आजीला पाहण्यासाठी आला. मात्र आजीची भेट घेऊन तिला बघून तिच्याशी बोलण या नातवाच्या नशिबी नव्हत. तो घराची पायरी चढत असतानाच त्याच्यावर काळाने झडप घातली. आणि नातवाचा हृदयविकाराच्या झटक्याने नातवाचा मृत्यू झाला. तर त्यानंतर अवघ्या दोन तासांच्या अंतराने आजीनेही जगाचा निरोप घेतला. या घटनेने संपूर्ण फैजपूर शहर सुन्न झाले आहे. ही घटना मंगळवारी घडली आहे. वैभव विष्णू मोरे (२४) असं मयत नातवाचं नाव आहे, तर कमलाबाई कोंडू मोरे या नव्वदीच्या आजीबाईंनी प्राण सोडले.

फैजपूर शहरातील लक्कड-पेठ भागात डी के मोरे ज्वेलर्सचे दत्तात्रय मोरे वास्तव्याला आहेत. त्यांची आई कमलाबाई या त्यांच्याकडे राहत असतात, तर त्यांचे दुसरे भाऊ विष्णू मोरे हे त्यांच्या कुटुंबासह फैजपूर शहरातीलच भारंबे वाड्यात राहतात. आई कमलाबाई यांची प्रकृती गंभीर असल्याबाबत दत्तात्रय मोरे यांच्याकडून मंगळवारी सकाळी भाऊ विष्णू मोरे यांना कळविण्यात आले. आजीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाल्यावर विष्णू मोरे यांचा मुलगा वैभव ऊर्फ विक्की हा आजीला पाहण्यासाठी काकाच्या घराकडे निघाला.

मात्र काकाच्या घराची पायरी चढताच वैभव याला तीव्र हृदयविकाराचा झटका आला. यात तो खाली कोसळला, या ठिकाणच्या नातेवाईकांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. वैभवला डॉक्टरांनी मयत घोषित केले. या घटनेने मोरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असता, दुसरी दुःखद घटना घडली.

नातू वैभवच्या मृत्यूनंतर अवघ्या दोन तासांनी वैभवची आजी कमलाबाई यांचाही मृत्यू झाला. वैभव मोरे याचा पहाटे चार वाजेच्या सुमारास, तर त्याची आजी कमलाबाई मोरे यांचा दोन तासाच्या अंतराने सकाळी सहा वाजता मृत्यू झाला. आजीची भेट घेण्यासाठी वैभव घरापर्यंत पोहचला मात्र आजीला पाहण्यापूर्वीच त्याच्यावर हृदयविकाराच्या झटक्याने काळाने त्याला गाठल. वैभव आणि आजीची शेवटची भेट होऊ शकली नाही.

 

एकाच दिवशी अवघ्या दोन तासांच्या अंतरात आजी व नातवाच्या मृत्यूने फैजपूर शहर सुन्न झालं आहे. मंगळवारी दुपारी आजी आणि नातवाची एकाचवेळी अंत्ययात्रा निघाली. शोकाकुल वातावरणात दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शहरातील नागरिक व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave A Reply

Your email address will not be published.