नागरदेवळ्यात अल्पवयीन मुलासोबत लैंगिक अत्याचार… आरोपीस अटक

0

 

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

नगरदेवळा ता. पाचोरा येथील एका अल्पवयीन मुलावर गावातीलच एका युवकाने अनैसर्गिक कृत्य केल्याचा प्रकार उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, दि. २५ जुलै रोजी रात्री आठ वाजता पीडित मुलाचे आई-वडील शेतीची कामे संपवून घरी आले. मात्र त्यांना मुलगा घरी दिसला नाही. त्यामुळे त्यांनी शोध घेतल्यावर कळाले की गावातीलच गोलू (उर्फ) ज्ञानेश्वर दिनकर महाजन रा. नगरदेवळा यांच्यासोबत असल्याचे कळाले. आई-वडील हे गोलू महाजन यांच्या घरी गेले व दरवाजा उघडण्यास सांगितले तेव्हा त्याचा घराचा दरवाजा आतुन बंद होता. दरम्यान पिडीत मुलाच्या परिवाराने महाजन याच्या घराच्या खिडकीतून आत डोकावून पाहिले असता अनपेक्षित असे कृत्य त्यांच्या नजरेस पडले.

त्यांनतर पिडीत अल्पवयीन मुलाच्या वडिलांच्या फिर्याद वरुन पाचोरा पोलीस स्टेशनला आरोपी गोलू उर्फ ज्ञानेश्वर दिनकर महाजन याच्या विरोधात पोक्सो ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. पुढील तपस पाचोरा पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पो. उपनिरीक्षक योगेश गणगे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.