देवदर्शनाला जाणाऱ्या भक्तांवर काळाचा घाला

बोहर्डीजवळ अपघातात दोन ठार

0

सावदा , लोकशाही न्यूज नेटवर्क  

सावदा येथील मित्रासोबतमोटर सायकलीने बोदवड तालुक्यातील शिरसाळा मंदिरात देवदर्शनाला जाणाऱ्या  दोघांवर काळाने घात केल्याची घटना घडली आहे.   बोहर्डी गावा जवळील पेट्रोल पंपाच्या अलीकडेच अज्ञात वाहनाने मोटरसायकलीस जोरदार धडक दिल्याने एक जागीच ठार तर दुसरा रुग्णालयात उपचारादरम्यान ठार झाल्याची घटना शनिवारच्या पाहटे सहा वाजेच्या सुमारास घडली.

सावदा ता. रावेर  येथील  भुषण किशोर पुर्भी आणि भुषण चंद्रकात कुंभार हे दोघे एका मोटर सायकलवर तर दुसरे दोघे  भास्कर पाडूरंग कुंभार आणि लखन पकंज कुंभार (सर्व रा. इंदिरा चौक सावदा ता. रावेर ) हे दुसऱ्या मोटर सायकलवर असे चौघ मित्र हे नित्यनेमाने दर शनिवारी  बोदवड तालुक्यातील शिरसाळा मंदिरात दर्शनाला जात असताना चौघा मित्रांच्या दोन मोटर सायकली मुक्ताईनगरकडे जात असताना मागे राहिलेली मोटरसाकल क्र. एम एच १९ डी एम ८७८९ बोहर्डी गावा जवळील त्यांच्या मागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने  एच एस फ्युल पेट्रोल पंपाच्या थोड्याच अंतरावर मोटर सायकलीस जोरदार धडक दिल्याने भास्कर पाडूरंग कुंभार व लखन पकंज कुंभार हे दोघेही  गंभीर जखमी झाले.  दरम्यान जोरात आवाज आल्याने भुषण पुर्भी याने आपली मोटर सायकल थांबवून बघीतले असता आपल्याच मित्राचा अपघात झाल्याचे दिसून आले.

दोघे जखमींना ऑटो रिक्षाच्या मदतीने वरणगाव ग्रामीण रुग्णालयालत उपचारासाठी दाखल केले असता भास्कर कुंभार याला डॉ. क्षितीजा हेडवे यांनी तपासून मृत घोषित केले तर जखमी लखन कुंभार यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जळगाव जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचाही मुत्यू झाला.  नित्यनियामाने दर शनिवार देव दर्शनाला जाणारे चौघे मित्रांपैकी दोघावर मात्र काळाने घात केला.

याबाबत वरणगाव पोलीस स्टेशनला भुषण पुर्भी यांच्या खबरी वरून अज्ञात वाहन चालका विरोधात भा द वि कलम २७९ , ३३७ , ३३८ , ४२७ , १८४ , १३४ (ब ) प्रमाणे अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास उप निरिक्षक परशुराम दळवी हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.